suvichar marathi | मराठी सुविचार

 

|| suvichar marathi | मराठी सुविचार ||

suvichar marathi | मराठी सुविचार marathi manoranjan मराठी मनोरंजन
suvichar marathi

 

१) मुलांनों ! आधी तुम्ही सरस्वतीचे पूजक व्हा.

२) विद्या विनयेन शोभते.

३) सत्यं शिवं सुंदरम् ।

४) आई हीच बालकाची पहिली गुरू आहे.

५) मातृ देवो भव ।

६) आई सारखं दुसरं दैवत जगात नाही.

७) आई-वडील गुरुजन ह्यांचा मान राखा.

८) ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे.

९) विद्या हेच धन.

१०) जे दान दिल्याने संपत नाही, तर उलट वाढत जाते, ते दान
म्हणजे विद्यादान.

११) माता ही प्रेमाची सरिता आहे.

१२) शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

१३) कठीण समय येता कोण कामास येतो.

१४) आईची माया अन् पित्याचं प्रेम हे पैशाच्या तराजूत मोजू नका.

१५) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६) शाळा हे सरस्वतीचं मंदिर आहे. ते स्वच्छ ठेवा. त्याचे पावित्र्य
राखा.

१७) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

१८) क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

१९) अधिक मित्र हवे असतील, तर दुसऱ्याच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

२०) सद्गुणांची बेरीज अन् र्दुगुणांची वजाबाकी करा. २१) जीवनाच्या गणितात समाधानाचा हातचा विसरू नका.

२२) वाचन, मनन अन् पाठांतरानेच नीट अभ्यास करता येतो.

२३) पुस्तकी ज्ञानाचे धडे जीवनाच्या अनुभव शाळेत गिरवा.

२४) जिवाचं रान केल्याशिवाय ज्ञानाची बाग फुलत नाही.

२५) न पाळता येणारा शब्द देऊ नका.

२६) आपण गोड बोललो कि, आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात.

२७) शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा.

२८) मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत, ती म्हणजे आई.

२९) स्वामी तिन्हीं जगांचा आईविना भिकारी.

३०) जीवनाचा पतंग आशेच्या दोऱ्यावर विरहत असतो.

३१) श्रद्धा असेल तर दगडांतही देव दिसतो.

३२) गरज ही शोधाची जननी आहे.

३३) जगा आणि जगू द्या.

३४) जबाबदारी माणसाला प्रौढ बनविते.

३५) जीवनात विनोद आणि हास्य ह्याला महत्त्वाचं स्थान आहे,
पण जीवनाचे हसे करू नका.

३६) मित्र ओळखा-मैत्री वाढवा अन् जपाही.

३७) आनंद हा भोगात नसून त्यागात आहे.

३८) दान हा हाताचा गौरवशाली दागिना आहे.

३९) धन हे ज्याचे गुलाम तोच खरा भाग्यवान, पण धनाचा गुलाम झाला तो मात्र अभागी.

४०) दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत
नाही.

४१) मरावे परि कीर्ती रूपे उरावे.

४२) दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास.

४३) खरा मित्र मिळवण्यासाठी आपले अंत:करण द्यावे लागते.

४४) उद्या करायचं ते काम आज करा, अन् आज करायचे काम
आत्ताच करा.

४५) प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग एकच आहे व तो म्हणजे अंधार.

४६) बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले.

४७) दुःखाचा कडेलोट म्हणजे सुखाची पहाट होय.

४८) सत्यमेव जयते.

४९) सत्याला सतत सामोरे जा.

५०) सत्य सांगायला भिऊ नका.

५१) उद्योगाचे घरी लक्ष्मी तेथे वास करी.

५२) निरोगी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे.

५३) प्रयत्ने वाळूचे कन रगडता तेलही गळे.

५४) जो अधिक शिकेल तो सूर्यासारखा चमकेल.

५५) विद्येवाचून जीवन व्यर्थ आहे.

५६) ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव आहे तोच खरा ज्ञानी होय.

५७) लवकर उठे, लवकर निजे त्याला विद्या, बल, संपत्ती मिळे.

५८) चांगल्या विद्येचे संपादन हेच सुखाचे साधन.

५९) गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे.

६०) माता आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.

६१) दुर्लक्ष, घाई, स्तुती अन् आळस ही अभ्यासातली अडचण आहे.

६२) चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण आहे.

६३) मुले ही देवाघरची फुले आहेत.

६४) जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

६५) शिक्षण हे उत्कर्षाच्या इमारतीचा पाया आहे.

६६) विद्यादान हे उत्तम दान आहे.

६७) जेथे शब्दांचा सुकाळ तेथे बुद्धीचा दुष्काळ.

६८) क्षमा हे ज्ञानाचे भूषण आहे.

६९) मानवता हाच खरा धर्म आहे.

७०) स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते.

७१) आज्ञाधारकपणा ही सुयशाची जननी आहे.

७२) काय वाचतो ह्यापेक्षा काय लक्षात राहते, ह्यावरच हुषारी अवलंबून असते.

७३) तोंडून गेलेला शब्द आणि निघून गेलेली वेळ परत येत नाही.

७४) चारित्र्य हा आरसा आहे, तो स्वच्छ ठेवा.

७५) संस्काराचे बीजारोपण हे बालपणाच्या ओल्या मातीतच होते.

७६) शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर संस्काराने तो सुसंस्कृत होतो.

७७) स्वाभिमानी असा, अभिमानी होऊ नका.

७८) वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका.

७९) हृदयातला माणुसकीचा झरा आटू देऊ नका.

८०) लोभी नको, निर्लोभी व्हा.

८१) मौनं सवार्थ साधनम् ।

८२) चांगले वाचन, चांगले विचार अन् चांगले आचरण ठेवा.

८३) नाती रक्ताची नकोत, मना मनांची जोडा.

८४) दिल्या वचनाला जागा.

८५) बोलताना विचारपूर्वक, ठाम अन् स्पष्ट बोला.

८६) अपयशाच्या चिखलात पाय रोवल्याशिवाय यशाचं कम हाती येत नाही.

८७) आनंद हा भोगात नसून त्यागात आहे.

८८) नि:स्वार्थी बुद्धीने केलेले कर्तव्य कधीही वाया जात नाही.

८९) दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घाला.

९०) विद्या हेच धन.

९१) जीवनात कला नसेल तर ते विफल ठरेल.

९२) तोडणे सोपे, जोडणे मात्र अवघड.

९३) हसा आणि इतरांना हसवत रहा.

९४) मूर्खाच्या संगतीपेक्षा एकांत बरा.

९५) विनासहकार नही उद्धार.

९६) समाधान हे श्रेष्ठ धन आहे.

९७) भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.

९८) अति परिचयात अवज्ञा.

९९) अति तेथे माती.

१००) चव ही जिभेला नसून ती मनाला असते.

१०१) मनुष्य स्वत:च स्वत:चा मित्र किंवा शत्रू असतो.

१०२) जीवन हे एक आव्हान आहे. ते स्वीकारा.

१०३) पुस्तकांची नीट निगा राखा.

 

मित्रानो जर तुम्हाला आमच्या लेखातील हा छान मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर नक्की कॉमेंट कळवा.तुमची एक छान कॉमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास उर्जा  देते आणि  हि पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा 

Leave a Comment