100+ marathi suvichar | मराठी सुविचार

100+ marathi suvichar | मराठी सुविचार

100+marathi suvichar | मराठी सुविचार marathi manoranjani
suvichar marathi

100+ marathi suvichar | मराठी सुविचार

१. शाळा हे समाजाने, समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे. 

२. सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप आणि आचार, विचार, उच्चार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण - क.भा. पाटील

३. चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.

४. सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण. - ॲरिस्टॉटल

५. दुसऱ्याच्या दुःखांचा जो विचार करावयास शिकला, तोच खरा सुशिक्षित.

६. वाचन माणसास पुर्णत्वाकडे नेते, संभाषणाने माणूस तत्पर बनतो.

७. मुलांचे मोठेपण आईच्या हाती असते.

८. नम्रता हा माणसाचा खरा दागिना होय.

९. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.

१०. भिकेच्या पोळीपेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली.

११. ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समानतेचा विस्तार. - साने गुरुजी

१२. जीवन फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशांसारखे ठेवा.

१३. कुसंस्कारास सुवळण व सुसंस्काराची उन्नती हेच खरे शिक्षण होय.

१५. शिक्षण म्हणजे आत्म्याच्या विकासाचे साधन होय.

१६. व्यक्तिमत्त्व विकासाचे व सामाजिक क्रांतीचे प्रभावी साधन म्हणजे शिक्षण.

१७. बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकरेने फुलवीत असतात, तेच गुरू.

१८. सशस्त्र माणसापेक्षा अधिष्ठान असलेलाच माणूस अजिंक्य असतो.

१९. ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.

२०. प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.

२१. अज्ञानी असणे हा गुन्हा नाही; तर ज्ञान मिळवण्यासाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे.

२२. अतिशयोक्ती ही असत्याची जननी आहे.

२३. संकटकाळी जो उपयोगी पडतो, तोच खरा मित्र.

२४. शिष्य कितीही विद्वान असला, तरी गुरुजनांच्या हाताखाली वागताना त्याची विद्वत्ता मावळतेच. - विनोबा भावे

२५. प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात.

२६. कोकीळा सुंदर गाते, म्हणून चिमणीचा चिवचिव करण्याचा हक्क हिरावून घेता येत नाही.

२७. द्वेशाने द्वेशाला उत्तर दिले तर द्वेश कधीच संपणार नाही. - म. गांधी

२८. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.

२९. पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते, व अंकुरीत होण्यासाठी गाडून घ्यावे लागते.

३०. स्त्रीशिक्षण म्हणजे भावी पिढ्यांच्या ज्ञानाची पाणपोईच होय.

३१. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

३२. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.

३३. लोखंड व्हा, सोने होऊ नका. - वि. स. खांडेकर

३४. कुलापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ असते.

३५. निर्जीव रत्नांची पारख करून त्याला अमूल्य ठरविणारे रत्नपारखी अनेक असतील, परंतु सजीव रत्नांची पारख करून त्यांना अलौकिकत्व प्राप्त करून देणार कर्मवीरांच्यासारखा रत्नपारखी विरळच - बॅ. पी.जी. पाटील

३६. शिकवीन ते आचरण करून दाखवीन. -विनोबा

३७.गरजवंताला अक्कल असते.

३८.जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष

३९. आधुनिक जगाला तारण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रेम होय.

४०. काळजी घ्यावी. पण काळजी करू नये.

४१. त्याग जीवनाचा पाया आहे, तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे.

४२. ध्येय नौकेत बसून प्रयत्नांचे वल्हे मारले म्हणजे यशाचा किनारा दूर राहत नाही.

४३. आईची ममता ही हिमालयाच्या उत्तुंग शिखरापेक्षाही उंच, विशाल व सागरापेक्षाही अथांग आणि आकाशातील पोकळीपेक्षाही भव्य असते.

४४. देशभक्ताचे रक्त म्हणजे स्वातंत्र्य वृक्षाचे बीजच होय.

४५. डरो नहीं, डर कायरता की निशानी है और कायरता मनुष्य की अंतीम दुर्दशा है । - महात्मा गांधी

४६. स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते. - महात्मा गांधी

४७. जीवन हा सुखाने भरलेला प्याला नसून कर्तृत्वाने भरावयाचे माप आहे.

४८. व्यक्तीचे जीवन पवित्र, शुद्ध आणि श्रद्धाशील बनविणे हे शिक्षणाचे ध्येय आहे.

४९. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

५०. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती.

५१. विवेकाचे दुसरे नाव विचार आहे. - स्वामी रामतीर्थ

५२. शरीर हे परमेश्वराचे मंदिर असून ते सुंदर, स्वच्छ व पवित्र राखणे म्हणजेच परमेश्वराची पूजा करण्यासारखे आहे. - साने गुरुजी

५३. मनाचा कोतेपणा हा अनेक दुःखाचे मूळ असू शकतो. - यशवंतराव चव्हाण

५४. चांगले विचार मनात नेहमी येत नाहीत, म्हणून ते मनात येताच कृती करा. - म. गांधी

५५. आळस हा मनुष्याच्या प्रत्येक कामात आड येणारा प्रबळ शत्रू आहे.

५६. सदाचार ही भाग्याची जननी आहे, तर दुराचार ही संकटाची जननी आहे.

५७. तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष आचरण म्हणजेच शिक्षण होय.

५८. शिक्षक हा वयाने वृद्ध होत असला तरी तो ज्ञानाने नेहमी तरुणच असतो.

५९. ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत बरी.

६०. गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.

६१. शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी व राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी असते.

६२. मन मोकळे सोडावे, पण जीभ मोकळी सोडू नये.

६३. शहाणा माणूस चुका विसरतो परंतु त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही.

६४. अहंकार व लोभ ही माणसांच्या अधोगतीची लक्षणे आहेत.

६५. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हावे.

६६. वाघासारखे बळ असावे, पण वाघाप्रमाणे वागू नये.

६७. विचार थकले की, विकार भडकतात.

६८. स्वार्थ हा एकच असा दुर्गुण आहे की, तो दुसऱ्याच्या ठिकाणी असलेलाही आपल्याला सहन होत नाही.

६९. शिक्षण म्हणजे आत्मविकासाचे साधन होय. - विवेकानंद

७०.नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ

७१. पुस्तके म्हणजे खिशातील बाग

७२.जग म्हणजे आत्म्याची पाठशाळा

७३. विद्यार्थीदशा ही परप्रकाशीत चंद्रासारखी असली तरी स्वप्रयत्नाने स्वप्रकाशीत सुर्यासारखी बनविता येते.

७४. संकटाच्या रणांगणात प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय विजयाची गाठ पडत नाही.

७५. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

७६. नुसती झाडे लावून काय उपयोग? त्याची फळे मिळवता आली पाहिजेत.

७७. मनातील काल्पनिक लाडवांनी भूक भागत नसते, त्यासाठी वास्तवातील कांदाभाकर

ही पुरे आहे.

७८. पाय पोटाला वाहून नेत नसतात, पोटच पायांना चालवत असते.

७९. जे भेकड असतात, त्यांना दोनवेळा मृत्यू येतो, एकदा स्वाभिमान नष्ट झाल्यामुळे
व एकदा मृत्यू आल्यामुळे.

८०. शरीर मोठे असून भागत नाही, तर अंतःकरण मोठे असावे लागते.

८१. सत्याच्या प्रकाशाला भिऊन समाज अंधारात व्यवहार करीत असतो, परंतु
शेवटी त्याला सत्याकडेच यावे लागते.

८२. कमी अपेक्षा ही अपयशापेक्षाही मोठा गुन्हा आहे.

८३. इच्छा असेल, तर मार्ग सुचतो.

८४. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

८५. जहाँ चाह वहाँ राह।

८६. साधी राहणी व उच्च विचारसरणी. - म.गांधी

विद्या विनयेन शोभते.

८८. अत्युत्कृष्ट विद्येचे संपादन हेच सुखाचे साधन.

८९. आई विना संगोपन म्हणजे, सत्त्व काढून घेतलेले अन्न, लोणी काढून घेतलेले
दूध व तेज काढून घेतलेली उष्णता होय.

९०. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला
तोची भला.

९१. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

९२. दिसामाजी कांहीतरी लिहीत जावे; प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.

९३. लीन असावे परंतु दीन असू नये.

९४. मर्यादाशील असावे परंतु भिडस्त असू नये.

९५. धर्माभिमानी असावे परंतु धर्मवेडा असू नये.

९६. राग असावा परंतु द्वेष असू नये.

९७. कर्मनिष्ठ असावे परंतु कर्मठ असू नये.

९८. काटकसरी असावे परंतु कृपण असू नये. - म.गांधी

९९. उदार असावे, परंतु उधळ्या असू नये.

१००. विनोद करावा परंतु थट्टा करू नये.

१०१. पुस्तक ही जागृत देवता आहे, तिची सेवा करणाऱ्यास तत्काळ वरदान प्राप्त होते.

१०२. प्रेम, ज्ञान व बल या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ
होता येते. - साने गुरुजी


मित्रानो जर तुम्हाला आमच्या लेखातील हा छान मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर नक्की कॉमेंट कळवा.तुमची एक छान कॉमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास उर्जा  देते आणि  हि पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा 

Leave a Comment