150+ मराठी सुविचार | marathi suvichar

 

|| 150+ मराठी सुविचार | marathi suvichar ||

 

150+ मराठी सुविचार | marathi suvichar marathi manoranjan मराठी मनोरंजन
150+ मराठी सुविचार

150+ marathi suvichar | मराठी सुविचार

 1. प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे.
 2. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.
 3. आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे.
 4. ज्योत जळत असते, तोवरच ती दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलीत करू शकते अथवा प्रकाश देऊ शकते.
 5. साफ-सफाई ज्या घरी, आरोग्य तेथे वास करी ।
 6. रागावणे ही कमजोरी व अज्ञानपणाची खूण आहे.
 7. दुःखीतांचे अश्रु पुसण्यासाठीच महापुरुष जन्माला येतात.
 8. चित्र ही हाताची कृती आहे; परंतु चरित्र ही मनाची कृती आहे.
 9. दुसऱ्यांच्या मनाचा विचार करावयास शिकला, तोच खरा सुशिक्षित.
 10. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते.
 11. कार्य कठीण है, इसी लिए करने योग्य है ।
  साधारण कार्य तो कोई भी कर सकता है ।
 12. बाहेरून होते ती वाढ व आतून होतो तो विकास होय.
 13. गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे.
 14. खरे पावित्र्य दुसऱ्यासही पवित्र करते.
 15. आपली स्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारली पाहिजे.
 16. एकमेकांच्या दुःखाशी समरस होणे याचेच नाव सहानुभूती.
 17. कामचुकारपणा हा आपणच पाळलेला शत्रू होय.
 18. शिक्षण म्हणजे सुधारणेचे प्रवेशद्वार होय.
 19. त्यागानेच मनुष्य मोठा होतो, भोगाने नव्हे.
 20. बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ असते.
 21. विश्वासामुळे माणसाला आत्मबल येते.
 22. प्रत्यक्ष वाईट वागण्यापेक्षा त्यावर पांघरुण घालणे वाईट असते.
 23. चंद्र आणि चांदण्यापेक्षाही शितल असतो सज्जनांचा सहवास.
 24. लोभ आणि अहंकारी वृत्ती माणसाच्या दुःखाचे सर्वांत मोठे कारण होय.
 25. आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेवून जाणारी संदेशवाहक म्हणजे प्रार्थना.
 26. ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही.
 27. उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सहाय्य करतो.
 28. दुसऱ्यांच्या हाताने पाणी पिऊन कोणाचीही तहान भागत नाही.
 29. जो भरा नहीं है भावों से, बहती उसमें रसधार नही ।
  वह हृदय नहीं, पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं ॥
 30. जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.
 31. परिश्रम वह चाबी है, जो मनुष्य के भाग्य के दरवाजे खोल देती है ।
 32. जीवनात पांडित्यापेक्षा चारित्र्याला जास्त महत्त्व आहे. – म. गांधी
 33. जो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो, तो कधीही मागे पडत नाही. – म. गांधी
 34. परिश्रमाशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
 35. अतिपरिचयाने चांगलाच्या चांगुलपणाचा देखील कंटाळा येतो आणि सावलीत विश्रांती घेणाऱ्या माणसाला काही वेळ तरी उन्हात जाऊन बसावेसे वाटते. लो. टिळक
 36. जीवन वृक्षाला लागलेली दोन गोड फळे म्हणजे; सज्जनांची संगत व प्रिय भाषण.
 37. प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे. म. गांधी
 38. देशाचा विकास करावयाचा असेल, तर बालकांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे.
 39. हसा, खेळा, पण शिस्त पाळा.
 40. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही.
 41. जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास प्राप्त होतो.
 42. जो मुलांचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
 43. स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो.
 44. शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे. – क भाऊराव पाटील
 45. ध्येयाचा वारा आपल्या जीवनात भरपूर शिरू दे, आपली जीवने मग सतेज दिसतील – साने गुरूजी
 46. जी भूमाता आपणास अन्न देते, तिच्या सेवेसाठी आपण नम्रपणे सदैव तत्पर असले पाहिजे. – क.भा. पाटील
 47. शाळा-शाळातून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व कर्तव्यदक्ष जबाबदार नागरिक बनले पाहिजेत. – क.भा. पाटील
 48. शिक्षक हा खेड्याचा आदर्श ग्रामसेवक, व प्रभावी ग्रामनायक झाला पाहिजे. – क.भा. पाटील
 49. सद्गुणी मुले हिच घराची, शाळेची, राष्ट्राची शोभा होय. – म. गांधी
 50. चांगल्या संगतीत मातीचे मोती बनतात.
 51. ऐकलेले विसरते, पाहिलेले स्मरण होते, व हाताची क्रिया पक्की लक्षात राहते.
 52. आळस आणि अती झोप हे दारिद्रयाला जन्म देतात.
 53. जगात असे एकच न्यायालय आहे की; जिथे सगळेच गुन्हे माफ करण्यात येतात, ते म्हणजे आईचे हृदय.
 54. मनुष्य की पहचान उसके कर्मों से होती है ।
 55. उठा जागे व्हा, आणि ध्येय पूर्तिवाचून थांबूच नका.
 56. उपासना म्हणजे चिंतन, मनन, किंवा ध्यान होय.
 57. सतत अभ्यासाने दुर्लभ असे काही नाही. २६३. आधी करावे मग सांगावे.
 58. श्रम न करता जगणे हा एक मोठा गुन्हा आहे.
 59. जसे इतरांनी तुमच्याशी वागावे असे तुम्हास वाटते, तसे तुम्ही इतरांशी वागा.
 60. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद होणे बरे.
 61. सेवा जग फुलविते पण प्रीती मन फुलविते.
 62. आईवाचून मोठे अन्य दैवत नाही..
 63. माता म्हणजे ममतेच्या महानम मंदिरांनी गजबजलेले तीर्थस्थान होय.
 64. २२९. आलस्य आवघाच दवडावा । यत्न उदंडची करावा । शब्दमत्सर न करावा । कोणी एकाचा ॥ – समर्थ रामदास स्वामी
 65. सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी कोसळतात, तशा अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
 66. समय की पाबंदी हमें सफलता देती है ।
 67. डरो मत, डर कायरता की निशानी है । और कायरता मनुष्य की अंतिम दुर्दशा है । – म.गांधी
 68. श्रमदान यह शक्तिशाली का सबसे बडा बल है ।
 69. निम हकीम खतरे जान ।
 70. पसीना आदमी के जिंदगी में रंग लाता है, न जाता व्यर्थ श्रम मीठे फल खिलाता है ।
 71. पसीना बहाने से ही समय करवट बदलता है, नयी पीढी, नया जीवन, नया इतिहास बनता है ।
 72. आवडीचे काम मिळाले नाही तरी मिळेल ते काम आवडीने करावे.
 73. ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही.
 74. नम्रता हे मनुष्याचे भूषण आहे आणि कर्म हीच खरी पूजा आहे.
 75. साक्षरता ही ज्ञान भांडाराची चावी आहे.
 76. सभी धर्मग्रंथ मनुष्य को सज्जन और पवित्र बनने का उपदेश देते है.
 77. विद्वान माणसं कधीही फक्त पुरुषार्थावर किंवा फक्त दैवावर अवलंबून राहत नाहीत. तर ती या दोन्हीचा विचार करून मार्ग आक्रमित असतात.
 78. बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ ।
 79. विश्वासामुळे माणसास बळ येते.
 80. सबब ही दुर्गुणाची माऊली आहे.
 81. मनुष्य मोठा विचित्र आहे, तो सुख घटाघटा पितो व दुःख चघळीत बसतो. – वि.स. खांडेकर
 82. दु:खी-कष्टी लोकांचा दुःख परिहार करणे हाच खरा धर्म आहे.
 83. दृढनिश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळते. लो. टिळक
 84. सर्व कर्माच्या यशाची किल्ली त्या-त्या कामात एकाग्र म्हणजे तल्लीन होऊन
  इतर सर्व गोष्टीचे भान विसरण्यात आहे. – लो. टिळक
 85. आळसात प्रारंभी सुख वाटते परंतु त्याचा शेवट मात्र दुःखात होतो.
 86. तत्परतेने उद्योग करण्यात प्रथम दुःख वाटते परंतु त्यापासून परिणामी होते. – संस्कृत सुभाषित
 87. महत्त्वकांक्षा नसणाऱ्या पुरुषाला मोठेपण प्राप्त होत नाही. सुख
 88. ज्ञानी लोकांना कर्माची लाज वाटू लागली किंवा कर्म करण्याचा कंटाळा येऊ लागला म्हणजे राष्ट्राच्या अवनितीचा काळ सुरु होतो.
 89. उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की; तुम्ही समर्थ व सुखी व्हाल. डॉ. राधाकृष्णन
 90. स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन, कारण पुस्तक जिथे असते, तिथे स्वर्ग निर्माण होतो. – लो. टिळक
 91. कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन. – साने गुरुजी
 92. आईने पाठीवरून प्रेमळपणाने हात फिरवून केलेले उपदेश साऱ्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतात. – साने गुरुजी
 93. आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व हे स्वर्गाहून अधिक आहे. – वाल्मिकी
 94. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. – वि.स. खांडेकर
 95. आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते; ते नुसते दूध नसते, तर त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. साने गुरुजी
 96. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी.
 97. आईच माझा गुरू व तेच माझा कल्पतरु । तिला मी कसे विसरु.
 98. आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते, तेच खरे शिक्षण,-डॉ. जॉन
 99. शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून, कृती होय. हर्बट स्पेन्सर
 100. सद्गुण आपोआपच प्रगट होतात. -सिसरो
 101. इष्ट गोष्टींचा अभ्यास व अनिष्ट गोष्टींचा त्याग करण्यानेच माणूस करारी बनतो. – गीता
 102. आत्मज्ञान हेच खरे ज्ञान. – भगवान महावीर
 103. ज्याप्रमाणे कुदळीने खणता खणता माणसाला पाणी सापडते; त्याप्रमाणे गुरुजवळ असणारी विद्या सेवा करणाऱ्याला प्राप्त होते.
 104. चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे.
 105. जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.
 106. पशूंना द्रव्याची इच्छा नसते; पण तीच इच्छा मनुष्याला पशू बनविते. – ना.ह. आपटे
 107. दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी झाडाला फळे येतात, गाई दूध देतात, नद्या वाहतात, तसेच हे शरीरही परोपकारासाठीच आहे. – पं. नेहरु
 108. नावे ठेवणे सोपे, परंतु नाव कमवणे कठीण ! – पं. नेहरु
 109. शिस्त कार्यक्षमता व तत्परता, या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कार्यक्षमता वाढते. – पं. नेहरु
 110. हसणारा सर्वांना हसवतो; पण रडणारा एकटाच रडतो. – पं. नेहरु
 111. अंतःकरणाला अंतःकरण जुळल्याशिवाय माणसाचीच नव्हे; तर राजकीय पक्षांची युती (मैत्री) कायम टिकणार नाही. – कॉलवर्ट
 112. प्रसंग अनेकांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच जन्मतो. – कॉलवर्ट
 113. त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही, आणि शांतिशिवाय प्रगती नाही. – कॉलवर्ट
 114. व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते. – कॉलवर्ट
 115. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात, त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
 116. ज्याच्या योगाने माणूस जगण्याच्या लायक होतो, त्याचे नाव शिक्षण. वि. भावे
 117. शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन, बुद्धी यांचा विकास होय. – वि. भावे.
 118. नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली, तो म्हातारा. वि. भावे
 119. चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण. – म.गांधी
 120. विद्या ही अमर्याद आहे, कितीही घेतली तरी संपत नाही, म्हणून प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे. – ह.ना. आपटे
 121. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याच प्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.
 122. जगात ज्ञान वाढत आहे, पण शहाणपण वाढत नाही. – टेनिसन
 123. अंधारात आपली सावलीही आपणाबरोबर येत नाही, तर मग संकटकाळी कोण साथ देणार?
 124. अनुभव आणि व्यवहार यांची सांगड घातल्या शिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही. – न. वि. गाडगीळ
 125. अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. – प्रान्सीस बेकन
 126. कर्तव्यशून्य कर्तृत्व वांझ होय. – स्वामी विवेकानंद
 127. ग्रंथाइतका प्रांजळ व निष्कपटी गुरू दुसरा मिळणार नाही. – न. चि. केळकर
 128. दुसऱ्याच्या सुख-दुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण.
 129. आळशी व बेकार लोकांशी मैत्री करू नका. – शेक्सपिअर
 130. जुलमाने विचार मरत नसतात, ते सुदृढ केले जातात. – जोसेफ मॅझीनी
 131. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे, कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. – ट्रायन एडवर्ड
 132. जितके निरीक्षण सूक्ष्म, तितकी समजुत अधिक, म्हणून जास्त सखोल व अधिक विचार करा. – मोरले
 133. विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून माणूस निर्मळ होतो. विचारी, समर्थ होतो.
 134. ज्या कलेच्या योगाने आत्मपरीक्षण करण्यास मदत होईल, तीच कला खऱ्या योग्यतेची होय.
 135. उनाडक्या करीत भडकत फिरण्यापेक्षा दिर्घोद्योगाची सवय करणे अधिक श्रेयस्कर. – म.गांधी
 136. खरे तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी असेल तेच शिकावे आणि देशहिताचेच कार्य करावे. – परांजपे
 137. पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. – म.गांधी
 138. यशाचा झरा चुकांच्या प्रवाहातून वाहत असतो.
 139. आत्मदर्शन हे जीवनातील काव्य आहे.
 140. शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे प्रवेशद्वार आहे.
 141. जगात सदगुणच शुक्रताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर तळपत असतात. – साने गुरुजी
 142. आपल्या भाग्याचा रस्ता आपल्या हातात आहे, चालण्याचा मात्र निर्धार केला पाहिजे.
 143. जगात डोळसपणे वावरताना पदोपदी अन् क्षणोक्षणी येणारे नवनवीन अनुभव म्हणजेच शिक्षण होय.
 144. अधिक पैशाच्या मागे लागू नका, परंतु पाठीमागे नाव राहील अशा सत्कार्यात पैसे गुंतवा.
 145. अस्तित्वासाठी संघर्ष हे माणसांच्या जीवनाचे महान सत्य आहे.
 146. शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी नसून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आहे. प्लेटो
 147. सौंदर्य हे भिष्माच्या प्रतिज्ञेत, अर्जुनाच्या एकाग्रतेत, हरिश्चंद्राच्या सत्य प्रीतीत, रामाच्या एकपत्नीव्रतात, कर्णाच्या दानशूरतेत, भरताच्या बंधू प्रेमात व सानेगुरुजींच्या मातृप्रेमात आहे.
 148. आजची काळजी तुम्ही घ्याल तर उद्याची काळजी परमेश्वर घेईल. – म.गांधी
 149. विश्व हे विद्यालय अन् खरा अनुभव हेच शिक्षण. – आगरकर
 150. मनुष्य वाचनाने पोपट बनतो पण अनुभवाने तो गरुड बनतो. – विनोबा
 151. नुसते भराभर वाचत जाणारे ज्ञान फलहीन वृक्षाप्रमाणे असते.

 

मित्रानो जर तुम्हाला आमच्या लेखातील हा छान मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर नक्की कॉमेंट कळवा.तुमची एक छान कॉमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास उर्जा  देते आणि  हि पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा 

Leave a Comment